About

Welcome to our Village

खोडशिवनी गावाची माहिती: गावाचे नाव: खोडशिवनी तालुका: सडक अर्जुनी जिल्हा: गोंदिया राज्य: महाराष्ट्र पिनकोड: 441801 भौगोलिक स्थान: अक्षांश: 21.348789 रेखांश: 80.212233 वाहतूक सुविधा: रेल्वे स्थानक: खोडशिवनी येथे स्वतःचे रेल्वे स्थानक आहे (स्टेशन कोड: KSIH). हे स्थानक एका सिंगल इलेक्ट्रिक लाईनवर असून येथे एकच प्लॅटफॉर्म आहे.

गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत नक्षलग्रस्त क्षेत्रात असलेल्या सडक/अर्जुनी पं.समिती क्षेत्रात पश्चिम दिशेला निसर्गरम्य वातावरणात बसलेले गाव खोडशिवनी. गावाचे एकुण क्षेत्रफळ ५१२.७४ हे आर. आहे. गावात एकुण ०३ वार्ड आहेत. गावाची एकुण लोकसंख्या २७६७ आहे. खोडशिवनी हे गोंदिया – कोहमारा या राज्‍यमार्गावर खजरी वरुन पश्चिमेला ४ कि.मी. अंतरावर आहे. ग्रा.पं. खोडशिवनी ची स्थापना सन- १९५१ ला झालेली आहे. ग्रामपंचयात ची मागील निवडनुक २०२२ ला झालेली असुन सद्या ग्रामपंचायत खोडशिवनी चे सरपंच श्री. गंगाधर बाबुराव परशुरामकर , उपसरपंच श्री. सत्यवान यादोराव नेवारे, ग्रामसेवक श्री. ओ.एन. कापगते हे आहेत. ग्रामपंचायतला आता पर्यंत सन- २००७-८ ला निर्मलग्राम पुरस्कार, सन- २००८-०९ ला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तालुकास्तर प्रथम, जिल्‍हास्‍तर द्वितीय पारितोषिक मिळालेले आहे.

गावात १ जिल्हा परिषद शाळा, ३ खासगी शाळा आहेत. अंगणवाडी केंद्र ३ असुन त्यामध्ये १००% शौचालयाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. गावामध्‍ये whatsapp ग्रुप द्वारे ग्रा.पं. संबंधाने सर्व माहिती ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात येते. ग्रामपंचायत,जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे R.O व वाटर कुलर आहे. तसेच गावातील सर्व नागरीकांन करीता सार्वजनिक R.O व वाटर कुलर बसविण्यात आला आहे. गावातील सर्व शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, वाजनालय तसेच सार्वजनिक ठिकाणे CCTV कँमेराच्या निगरानिमध्ये आहेत. शाळेतील मुलांसाठी खेळण्यासाठी सूशोभीत क्रीडांगण, वृक्षारोपण तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे (सि.विहीर, गुरांचे गोठे,शेळी शेड,नाडेप खड्डे) ई.कामे ग्रा.पं.मार्फत करण्यात आलेली आहेत. म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये ३१३३२ मनुष्य दिवस निर्माण झालेली आहेत. गाव ODF+ झालेले आहे.

ग्रामपंचायत ने विविध उपक्रम हाती घेतले असुन गावामध्ये मुलींचा जन्म दर वाढी करीता मुलगी जन्मलेल्या कुटुंबाला १ हजार रुपये प्रोत्साहन राशी वाटप करण्यात येते. गावात मैयत झाल्यास बांबु तोड होवु नये म्हणुन ग्रा.पं. मार्फत २ तिरड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गावा मध्ये प्रत्येक कुंटुबाला १ उच्च जातीचे कलम केलेले आंब्याचे झाड वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षात रमाई आवास, सबरी आवास, मोदी आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजनांच्या माध्यमातुन ११५ घरकुल बांधकाम करण्यात आले आहेत. गावातील महीलांना सामाजीक क्षेञातील आत्मविश्वास वाढविण्याकरीता विवध कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यात सुञसंचालनाची तसेच कार्यक्रमाची संपुर्ण जबाबदारी दिली जाते. ग्रा.पं.ने राखुन ठेवलेल्या नर्सरी मधील मोह, पळस, चार, बांबु पासुन ग्रा.पं.ला उत्पन्न होते. गावातील युवकांना स्वतःचे व्यवसाय गावातच करता यावे म्हणुन गावात २१ दुकान गाडे आहेत. गावात आठवडी बाजार असुन त्यात बाजार ओट्यांची व्यवस्था आहे. गावामध्ये संपुर्ण दारु बंदी करण्यात आलेली आहे. गावात ५० टक्के पेक्षा कमी मायक्रान च्या प्लाँस्टिक वर बंदी आहे. सिंचना करीता गावाजवळुन वाहत जाणा-या चुलबंद नदिवर लोक वर्गणिमधुन लिफ्ट एरेगेशन करुन तलावात पाणी आणले जाते.

एकंदरीत ग्रा.पं.मध्ये विकासाच्या योजना १००% राबविण्याचा प्रयत्न केला आहे. व विकासाच्या योजना राबवितांना विविध विभाग तसेच गावातील विविध घटक या सर्वांना योग्य प्रमाणात समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच विकासाच्या विविध योजना राबवीत असतांना वेळोवेळी गावातील नागरीकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे. तसेच अनेक कामे लोकसहभागातुन केले जातात.

लोकसंख्या(सन 2011 नुसार )

पुरुष

महिला

एकूण कुटुंब संख्या

Our Values

What we value most

विज ऊप केंद्र खोडशिवनी

हे उपकेंद्र परिसरातील विज पुरवठा व्यवस्थापन आणि वितरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. विज उपकेंद्रे स्थानिक पातळीवर विजेचे वितरण सुनिश्चित करून, ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना अखंडित विज पुरवठा देण्याचे कार्य करतात.​ खोडशिवनीतील विज उपकेंद्रामुळे स्थानिक शेती, उद्योग आणि घरगुती वापरासाठी आवश्यक विजेची उपलब्धता सुनिश्चित होते, ज्यामुळे आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळते.

जल शुद्धीकरण केंद्र खोडशिवनी

सामान्यतः, जल शुद्धीकरण केंद्रे पिण्यायोग्य पाणी पुरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. या केंद्रांमध्ये पाण्यातील घनकण, सूक्ष्मजंतू आणि इतर दूषित पदार्थ काढून टाकण्यासाठी विविध प्रक्रिया केल्या जातात, ज्यामुळे पाणी सुरक्षित आणि शुद्ध होते。

प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी

खोडशिवनी (जिल्हा गोंदिया, तालुका सडक अर्जुनी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) स्थानिक नागरिकांना महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा प्रदान करते. या केंद्रात प्रसूती कक्ष, वॉर्ड, औषध साठा, लसीकरण कक्ष, प्रयोगशाळा आणि शस्त्रक्रिया कक्ष यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

शैक्षणिक शिक्षण

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आणि दामोदर वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ७ पर्यंतचे शिक्षण दिले जाते, शामसुंदर बोरकर महाविद्यालयात इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत शिक्षण होते, आणि स्व. सायंत्राबाई मस्के ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता ११ वी व १२ वी चे शिक्षण दिले जाते

व्हॉट्सअप ग्रुप

व्हॉट्सअप ग्रुप – गावातील लोकांसाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करून माहिती पटकन शेअर करता येतात.

फेसबुक पेज किंवा ग्रुप

फेसबुक पेज किंवा ग्रुप – गावासाठी फेसबुक ग्रुप तयार करून घोषणा, कार्यक्रम आणि चर्चा शेअर करता येतात.

लाऊडस्पीकर घोषणा

लाऊडस्पीकर घोषणा – गावाच्या चौकात किंवा मंदीराजवळ माईक आणि स्पीकरद्वारे सूचना दिल्या जाऊ शकतात.

ग्रामसभा आणि बैठक

ग्रामसभा आणि बैठक – गावकऱ्यांची सभा बोलावून नवीन माहिती सांगता येईल.

माहिती सेवा (Information Services)

या माध्यमातून गावातील नागरिक आणि बाहेरील लोकांना गावाची संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होईल.

गावाचा इतिहास आणि परंपरा (Village History & Culture)

आमच्या गावाचा इतिहास अनेक वर्षांपूर्वीपासून सुरू झालेला आहे. गावाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. आमच्या गावाची संस्कृती समृद्ध असून, पारंपरिक सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात.खोडशिवनी हे गाव झाडीपट्टी तील लोककला , नाटक, तमाशा, दंडार ह्या करीता नावाजलेले गाव आहे. ह्या गावात दर वर्षी दिवाळी व भाऊबीज च्या शुभ पर्वावर गावातीलच कलावंताच्या रंगलेल्या तालमितील ह्या सर्व लोककला सादर केल्या जातात.

महत्त्वाची ठिकाणे (Important Places in the Village)

गावातील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती येथे दिली आहे.

1.शैक्षणिक संस्था: ज़िल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, दामोदर वरिष्ठ प्राथमिक शाळा, शामसुंदर बोरकर महाविद्यालय, स्व.सायंत्राबाई मस्के जुनिअर कॉलेज

2.आरोग्य केंद्रे: प्राथमिक आरोग्य केंद्र

3.धार्मिक स्थळे: संकटमोचन हनुमान मंदिर ,क्रांतीसूर्य बिरसा मुंडा , क्रांतीसूर्य म.ज्योतिराव फुले स्मारक,भगवान विश्वकर्मा,भगवान गौतम बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक,वीर एकलव्य

4.बँका आणि पोस्ट ऑफिस: ग्राहक सेवा केंद्र , पोस्ट ऑफिस

5.आठवडी बाजार : मंगळवार

संपर्क निर्देशिका (Contact Directory)

गावातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि सेवांचे संपर्क क्रमांक येथे दिले आहेत.

1.ग्रामपंचायत कार्यालय: +91 9823989917

2.सरपंच आणि ग्रामसेवक: सरपंच - +91 9823989917 ग्रामसेवक - +91 9850439203 उपसरपंच - +91 9579462661

3.पोलीस पाटील: भृगराज परशुरामकर +91 9545035617

4.आपत्कालीन सेवा (रुग्णवाहिका, अग्निशमन):रुग्णवाहिका - 108 अग्निशमन- 101

5.खाजगी डॉक्टर :- डॉ. आर. बी. वाढाई +91 9823480563

महत्त्वाचे दैनंदिन अपडेट्स (Daily Updates & Notifications)

गावकरी बांधवांनी कृपया कोणत्याही अनोळख्या किंवा शंकाास्पद लिंक WhatsApp ग्रुपवर शेअर करू नयेत, तसेच अशा लिंक ओपनही करू नयेत. या प्रकारामुळे तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता असते. लिंक वर क्लिक करताना ती विश्वासार्ह व्यक्तीकडून आली आहे की नाही, हे नक्की तपासावे. शक्य असल्यास ती लिंक तज्ज्ञ व्यक्तीकडून पडताळून घेऊनच ओपन करावी किंवा फॉरवर्ड करावी. सावध रहा, सुरक्षित रहा!

Gallery

  • All
  • कार्यक्रम
  • भूमिपूजन
  • शिबीर
  • विशेष

कार्यक्रम

भूमिपूजन

शिबीर

बाग

कार्यक्रम

भूमिपूजन

शिबीर

बाग

कार्यक्रम

भूमिपूजन

शिबीर

कार्यक्रम

कार्यक्रम

कार्यक्रम

कार्यक्रम

कार्यक्रम

कार्यक्रम

कार्यक्रम

कार्यक्रम

कार्यक्रम

कार्यक्रम

कार्यक्रम

Team Members

Our hard working team

अनु क्रमांक नाव पद वॉर्ड
1 श्री. गंगाधर बाबुराव परशुरामकर सरपंच जनतेतून निवडून आले
2 श्री सत्यवान यादोराव नेवारे उपसरपंच प्रभाग ३
3 श्री महेश नीलकंठ परशुरामकर सदस्य प्रभाग १
4 श्री आशिष नामदेव टेंभुरकर सदस्य प्रभाग २
5 श्री चंद्रशेखर महादेव मेश्राम सदस्य प्रभाग २
6 सौ.चांगुणा नरेश टेंभुर्णे सदस्य प्रभाग १
7 सौ.दुर्गा कैलास कापगते सदस्य प्रभाग १
8 सौ.खेमुताई रमेश परशुरमकर सदस्य प्रभाग २
9 सौ.इंदुताई उद्धव परशुरामकर सदस्य प्रभाग ३
10 श्री.ओ.एन.कापगते ग्रामपंचायत अधिकारी
11 श्री.के.आर. नेवारे परिचर
12 श्री.एन.एच.वरकडे परिचर
13 श्रीकांत दशरथ लंजे संगनक परिचालक
14 श्री गुरुचरण टेंभुर्णे ग्राम रोजगार सेवक

Contact

Contact Us

Address

Khodseoni, Maharashtra, India

Open in Maps

Call Us

+91 9823989917

सरपंच :- श्री. गंगाधर बाबुराव परशुरामकर

Email Us

gpkhodshivani25@gmail.com

Open Hours

Monday - Friday

9:00AM - 05:00PM

Loading
Your message has been sent. Thank you!